इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसीतील कंपनीत बेकायदा ऑक्सिजन सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे.कारवाईत 51 भरलेले तर 21 रिकामे ऑक्सिजन सिलेंडर जप्त केले आहेत.
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली होती. यावरुन ही कारवाई इंदापूर पोलीसांनी केली आहे. Yaxis Structural Steel Pvt. Ltd कंपनीत पोलीसांनी धाड टाकली होती.
यावेळी एकुण ७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. मात्र ११ एप्रिल रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भातील काही निर्देश दिले आहेत .
ऑक्सिजन फक्त अत्यावश्यक सेवांना म्हणजेच मेडीकलच्याच वापरास परवानगी आहे. यामुळे या कंपनीत एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा कसा ? करण्यात आला असा प्रश्न निर्माण झाला आहे.