युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका शुक्रवारी संपल्या आणि यावेळी हर्षित सिंघल यांची १२ मतांनी निवड करण्यात आली. मार्च महिन्यातच त्यांनी ज्योदिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.मध्य प्रदेशमध्ये युवक काँग्रेसकडून चक्क भाजप नेत्याची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सिंघई यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला. जेव्हा मी शिंदे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला,तेव्हा काँग्रेसला माझे नाव निवडणुकीतून वगळण्याची विनंती केली होती. पण त्यांनी तसे काही केले नाही. मी परत फोन केला तेव्हा त्यांनी ईमेल करत पक्ष सोडण्याची कारणे देण्यास सांगितले. युथ काँग्रेस संपूर्ण मध्य प्रदेशात हेच करत आहे. जे पक्षात नाहीत त्यांनी निवडून आणत आहे, अशी टीका हर्षित सिंघल यांनी केली आहे.
शुक्रवारी भाजप नेता हर्षित सिंघई यांना अचानक शुभेच्छांचे मेसेज, फोन येऊ लागले. त्यावेळी त्यांना आपली निवड युवक काँग्रेसकमध्ये सरचिटणीसपदी निवड झाल्याचे समजले. त्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला.