एका दिवसात दिलजीत दोसांजचे वाढले चक्क एवढे फॉलोअर्स

23

गेले खूप महिन्यांपासून कंगना वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगना आणि दिलजीत यांच्या मध्ये देखील काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनामुळे भांडण सुरू आहेत. दोघांनी एकमेकांवर चुकीचे आरोप देखील केले आहेत. या भांडणाची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. या दरम्यान दिलजीतला एक फायदा झाला आहे. त्याने कंगना रनौतवर केलेल्या सणसणीत प्रत्युत्तराला खूप पाठींबा मिळाला आहे.

दिलजीतच्या चाहत्यांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे. त्याच्या ट्विटच्या फॅन्समध्ये लाखोंची वाढ झाली आहे. या सर्व वादामध्ये दिलजीतचे 4 लाख फॉलोअर्स झाले आहेत. कंगना आणि दिलजीत मधील शेतकरी आंदोलनावरून झालेला वाद अजून संपला नाही. दोघांचे मेम्स देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही भरपूर प्रमाणात ट्रोल देखील झालेले आहेत.

दरम्यान, दिलजीतने कंगणाला राजकीय नेत्यांसारखे वागु नकोस, कोणत्याही भूमिका घेण्याआधी विचार करावा असे सांगितले आहे. परंतु दोघांमधील वाद मिटण्याचे नाव घेत नाही. खूप दिवसांपासून दिलजीत आणि कंगना ट्रेंडीगचा विषय आहेत. तिचाही चाहता वर्ग मोठा आहे.