पवारांच्या बारामतीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

43

बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीचा बारामती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी पोलिसांना चार आरोपींना अटक केली आहे.

एका रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनाची गरज होती. म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाने पोलिसांच्या मदतीने टोळीतील एकाशी संपर्क साधला. त्याने 35 हजाराला एक अशी मिळून 70 हजाराची दोन इंजेक्शन नातेवाईकाला विकत असताना बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

सूत्रांच्या माहितीनुसार एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत घरत, शंकर भिसे, दिलीप गायकवाड आणि संदीप गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

या आरोपीकडील 3 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन देखील जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यात आणखी कुणाचे लागेबांधे आहेत का याचा तपास देखील पोलिस करत आहेत.