मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आता रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उजेडात आला आहे. रेणू शर्मा हिने जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणालाही अशाच पद्धतीने छळले होते हे समोर आले आहे. सोशल मिडीयावरून ओळख झाली,मैत्री,भेटीगाठी, हॉटेलिंग हे सगळं दोन वर्ष चालले.
त्यानंतर मात्र रेणू शर्मा यांनी रिझवान कुरेशी विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती. अशी बातमी एका लोकप्रिय वृत्तपत्र समूहाच्या वेबसाईटने दिली आहे. सदरील प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. तर दुसरीकडे अशा महिलेने मुंडेंवर केलेल्या आरोपात काही तथ्य आहे की, मुंडेंनी खुलासा केल्याप्रमाणे हे फक्त ब्लॅकमेलिंगचेच प्रकरण आहे. हे सगळं येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.