सचिन तेंडुलकरच्या समर्थनार्थ भाजप मैदानात

18

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं ट्विट द्वारे प्रत्युत्तर दिलं होतं.परदेशी सेलिब्रिटींच्या हस्तक्षेपाला विरोध करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर  याच्या समर्थनार्थ आता भाजप पक्ष मैदानात उतरला आहे.

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांनी सचिन तेंडुलकरच्या घराच्या परिसरात जाण्यास मज्जाव केला. त्यासाठी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिनला विचारण्यात आला.