येणाऱ्या काळात या विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही : प्रवीण दरेकर

12

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्याच मुद्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काय चाललय, ते दिसून येतं. येणाऱ्या काळात या विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

वर्षा निवासस्थानी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली .शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट झाली. यावेळी बैठकीत दोघांमध्ये कुठल्या विषयांवर चर्चा झाली, ते दोघांनाच माहित आहे.असंही ते म्हणाले.