पश्चिम बंगालमध्ये आता भाजप विरुद्ध लढण्यासाठी, काँग्रेस- डाव्या पक्षांची आघाडी

8

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची तयारी चालवली आहे. डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसने मान्यता दिल्याचे काँग्रेसचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी जाहीर केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर, डाव्या पक्षांनी एकत्र यायला हवं अशी भूमिका सर्वच विरोधी डाव्या गटातील पक्षांनी घेतली होती. त्याला काँग्रेसने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात सर्व डावे पक्ष एकवटल्याच सध्या दृश्य आहे.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी मार्च, एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आघाडी करण्यासाठी सहमती दिली असल्याचं चौधरी यांनी ट्विट करत सांगितलं. या डाव्या आघाडीचा कितपत परिणाम निवडणुकीत पाहायला मिळतो ते येत्या काळात पाहायला मिळेल.