औरंगाबाद : रांजणगावमध्ये वंचितच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

26

काल ( दिनांक 26 ) रोजी रांजणगाव शे. पू. येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

शहर अध्यक्षपदी समीर हसन शेख यांची नियुक्ती करण्यात आली. स्थानिक शहराच्या तक्रारी स्थानिक पातळीवर सोडवता याव्या व पक्ष बांधणी मजबूत करावी म्हणून रांजणगाव शे. पू. शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. येणाऱ्या काळात पक्षाचे संघटक मजबूत करण्यासाठी जनसंपर्क ठेवण्यासाठी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

सदरील नियुक्ती व सत्कार करतांना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा कार्यक्रम प्रमुख तथा नगरपरिषद निरीक्षक जितेंद्र शिरसाठ, नगर परिषद निरीक्षक प्रा. सुनील वाकेकर, जिल्हा महासचिव ऍड. पंकज बनसोडे, उपाध्यक्ष मिलिंद बोर्डे, सहसंघटक हरिदास बोर्डे, सहसचिव अशोक खिल्लारे

सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब वक्ते, जिल्हा सदस्य तथा जेष्ठ नेते पी के दाभाडे, गंगापूर तालुका अध्यक्ष देविदास लांडे पाटील, उपाध्यक्ष बाबा भिवसने, महासचिव विक्रम ढेरे, भैय्यासाहेब जाधव, सचिव प्रवीण जाधव, सदस्य योगेश संकपाळ, अमृतराव डोंगरदिवे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.