पुणे महानरपालिकेच्या हद्दीलगत असलेल्या २३ गावांना पुणे महानगरपालिकेत सामाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार आग्रही होते अशी चर्चा होती. आता त्याच २३ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. या हद्दवाढीवर काही प्रमाणात विरोधही झाला होता.
यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला आहे. राज्य सरकारने 23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला आहे. असं पाटील म्हणाले.
सदरील गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने करावा. तेथील नागरिकांची आणि प्रशासनाने केलेली मागणी लक्षात घेऊन गावांच्या विकासासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करावी आणि मगच गावांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका होती. मात्र गोंधळलेल्या राज्य सरकारने काल घाईगडबडीत ही अधिसू्चना काढून या गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.