मुंबईत शिवसेनेत ईनकमींग, भाजपच्या “या” नेत्याचा सेनेत प्रवेश

32

मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याय. शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची निवडणुक म्हणजे अस्तित्वाची लढाईच असते. याच पार्श्वभूमिवर शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. या दरम्यान शिवसेनेत मोठी ईनकमींग सुरु झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये भाजपच्या नेत्यांचाच समावेश आहे.

काहीनदिवसांअगोदरच विर्लेपार्ले मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठच माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या ऊपस्थितीत त्यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतले. यावेळी यावेळी खासदार व शिवसेना सचिव अनिल देसाई, विभागप्रमुख विलास पोतनीस, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते ई. शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी ऊपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या या नेत्यांनी पक्षाला रामरान ठोकून शिवसेनेत प्रवेश केला असल्यामुळे भाजपला चांगलेच नुकसान होणार असल्याच्या शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवतायत. कारण मुंबईतील भाजपाच्या संघटनात्मक जडणघडणीत हेमेंद्र मेहता यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे बोलले जाते. सलग तीनवेळा बोरीवली मतदारंसघाच भाजपच्यावतीने त्यांनी प्रतिनिधत्व केलं आहे. बोरीवली भागात हेमेंद्र मेहता यांचे भरीव कार्य आहे. त्यामुळे या भागात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार आहे.

अलिकडे हेमेंद्र मेहता यांची पक्षाबद्दल नाराजी असल्याचे कळते. त्यातूनच त्यांनी भाजपला रामराम ठोकत नवी राजकीय वाटचाल सुरु केली आहे. विर्लेपार्ले मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीदेखील शुक्रवारीच सेनेत प्रवेश केला होता. सोबतच भाजपचे समीर देसाई यांनीदेखील भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसनेते प्रवेश केला होता. त्यामुळे आता भाजपाला बोरीवली, गोरेगाव आणि विर्लेपार्ले भागात चांगलाच झटका बसला आहे. तसेच या भागात शिवसेनेला बळकटी मिळविण्याची संधी या नेत्यांच्या सहाय्याने प्राप्त झाली आहे.

शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जुळवाजुळ सुरु आहे. यादरम्यान या ईनकमींगला सुरुवात झाली आहे. येणार्‍या काळात आणखी काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तिकडे भाजपकडूनसुद्धा मुंबीईतील निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. या नेत्यांनी भाजपाला रामराम केला असला तरी भाजपाचे धुरीणसुद्धा या निवडणुकांत सक्रीय असणार आहे. त्यामुळे आता निवडणुकांबाबत अौत्सुक्याचे वातावरण आहे.