औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची वाढ, मराठवाड्यातील रुग्णांना होणार मोठा फायदा

7

कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटरच महत्व हेरून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांच्यात CSR फंड मधून २५ व्हेंटिलेटर घाटीला देण्याचा करार झाला होता.

यापैकी १३ व्हेंटिलेटर त्यांनी दिले होते आज उर्वरित १२ व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थाचे आभार मानले.

यावेळी घाटीच्या डीन डॉ. कानन येळीकर डॉ. ज्योती बजाज, बजाज ट्रस्टचे सी. पी. त्रिपाठी, राम भोगले, CMIA प्रेसिडेंट कमलेश धूत, प्रसाद कोकील, सीमेन्सचे सुमित सचदेव, CII चैरमन रमण आजगावकर,शिवप्रसाद जाजू, सतीश लोणीकर आदि उपस्थित होते.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. औरंगाबाद कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट होत आहे. शासकीय रुग्णालयात मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागत आहे. मात्र, काही दानशूर व्यक्ती, संस्थांच्या माध्यमातून ही कमी भरून काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसतोय.