इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट दूध कंपनीतील बाटली आणि पशुखाद्य युनिटला आग लागली आहे. आगीचे कारण समजू शकलेल नाही
आगीत प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट या प्रकल्पाची इमारत असून यातील मुख्य युनिटला अचानक आज दुपारी आग लागली आहे.
यामध्ये दूध प्रकल्पाचे ड्रायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून यामध्ये कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.. दरम्यान छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि अन्य अग्निशामक दल या ठिकाणी रवाना झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे