इंदापुरच काय कुठलीही प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना उजनीत समाविष्ट करु देऊ नये : नारायण पाटील

32

इंदापुरच काय इतर कुठलीही प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना उजनीत समाविष्ट करुन अंतरिम मंजुरी देऊ नये, यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.

तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आलो असून माझी बांधिलकी मतदार संघातील नागरिकांशी असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उजनी प्रश्नासाठी वेळप्रसंगी वाटेल तेवढी राजकीय किंमत मोजायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील उद्योग व शहर प्रशासन यांना उजनी प्रकल्पात घाण, दुषित व सांडपाणी सोडू नयेत असे आदेश दिले होते. यामुळे जर सांडपाणी शब्दप्रयोग वापरुन नवीन उपसा सिंचन योजना मंजूर करत असतील तर या प्रकल्पासाठी थेट स्वतंञपणे यासाठी पुण्याहुन स्वतंत्र नियोजन करून पाणी घ्यावे असेही ते म्हणाले आहेत .