डिसेंबर 2021 पर्यंत किमान सर्व प्रौढांचे लसीकरण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारच्या वतीने 70 टक्के डोस हे दुसऱ्या डोससाठी उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा दावा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल आणि त्यामध्ये बालकांना असलेल्या धोक्यांवरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या आरोग्य सुविधा अपग्रेड केल्या जात असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.