भारताच्या मागील १०० वर्षात असे बजेट आले नव्हते; सीतारामनजी आभार : मिसेस फडणवीस

52

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काल चालू वर्ष 2021-22 या आर्थीक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आजच्या अर्थसंकल्पाने भ्रमनिरास केल्याच अनेक नेत्यांनी म्हटलं आहे.

पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “भारताच्या मागच्या शंभर वर्षात कधी झाला नाही असा अर्थसंकल्प” अशा शब्दात या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.” अमृता फडणवीस या आपलं मत व्यक्त करण्यासाठी कायम तत्पर असतात. त्यांनी कालच्या अर्थसंकल्पावर आपलं मत ट्विट करत मांडलं आहे.

‘भारताच्या मागील १०० वर्षांत असं अर्थसंकल्प सादर झालेलं नाही. हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. वाढीव कर लावल्याशिवाय देशाच्या प्रगतीस चालना कशी दिली जाऊ शकते हे आता जगातील सर्व देश बघतील आणि शिकतील ,’ असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.