भारताला एक देश एक निवडणुकीची गरज : नरेंद्र मोदी

3

भारताला एक देश आणि एक निवडणुकीची गरज आहे, अस मोदी यांनी म्हटलंय. “एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज आहे. राष्ट्राच्या हितात राजकारण नको”, असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संविधान दिनानिमित्त केवडियामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षं पूर्ण झाली, त्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित केलं. “आम्ही त्या जखमांना कधीही विसरू शकत नाही, असंही मोदी म्हणाले. 2008 मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता, या हल्ल्यात बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आजचा भारत नव्या धोरणासह दहशतवादाचा सामना करीत आहे.

एक राष्ट्र, एक निवडणूक ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक काही महिन्यांनंतर देशात कुठेतरी निवडणुका होत असतात, त्यामुळे यावर आता मंथन सुरू झाले पाहिजे. आपण संपूर्णपणे डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. कागदाचा वापर थांबविला पाहिजे. असंही मोदी म्हणाले.