येत्या 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा

25

   शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. शेतकरी नेते हरविंदर सिंग लखवाल यांनी सांगितले आहे की, कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारने काल दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

सिंधू बोर्डर येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संघटनांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सर्व शेतकरी संघटनांना केले आहे. दिल्ली – गाझीपूर बोर्डर बंद करण्यात आली आहे. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास 8 डिसेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल. दरम्यान, ‘याला फक्त पंजाब चळवळ म्हणणे सरकारचे षडयंत्र आहे, पण आज हे आंदोलन संपूर्ण भारतभर सुरू आहे आणि पुढेही होईल. असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला यांनी सांगितले आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी असे म्हटले की, आज तमिळनाडू आणि कर्नाटक येथे आंदोलन केले. येथील शेतकऱ्यांनी ही दिल्लीत येण्याचे आता ठरवले आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचे आव्हान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिल्लीच्या सीमेवरुन हटवण्याचे निर्देश द्यावे. अर्जदाराचे वकील ओम प्रकाश परिहार याबाबत माहिती दिली. परंतु, या अर्जावरील सुनावणीचा दिवस अद्याप ठरलेला नाही.