मुंबई : संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज विविध जगभरातील वृत्तपत्रांनी भारतातील हृदद्रावक कोरोना परिस्थितीचे चित्र मांडले आहे. आज मागच्या १० दिवसांपासून तीन लाखांपेक्षा जास्त आढळणारी रुग्णसंख्या आज चार लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच वैद्यकीय सेवा सुद्धा अपुरी पडू लागली आहे.
अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकारच्या नेत्यावर गंभीर आरोप लावले आहे. आज सर्व कोरोना रुग्णांना सेवा मिळाली पाहिते. दुर्दैवाना आपला महाराष्ट्र कोरोनाचा एपी संटेर झाला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत पोहचली पाहिजे. परंतु बलशाली नेत्यांनी आपल्या जिल्ह्याकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर जास्त पुरवले आहेत आ आरोप फडवणीसांनी आघाडीच्या नेत्यावर लावले आहेत.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आज काही भागांत मात्र १०० ते २०० रेमडेसीवीर आणि पुरेसा ऑक्सिजन पुरवठा केला आहे. तर आदिवासी भाग, आदिवासी पाड्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. पुर्वी कोरोनाच्या संसर्गाने परिवारातील एखादी व्यक्ती बाधित होत होता. परंतु यावेळी संपूर्ण परिवार कोरोना संसर्ग बाधीत होत आहे. आता सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. सामाजिक स्तरातील लोक अधिक संक्रमित होताना दिसत आहेत. राज्यातील वाढता कोरोनाचा प्रकार पाहता आरोग्य यंत्रणा विशेष करून आघाडी सरकार हे संपूर्ण हाताळण्याकरता कमी पडत आहे.