१० फेबृवारीपासून भारत विरुद्ध ईंग्लंड या कसोटी सामन्यास सुरुवात होते आहे. गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी नव्याने ऊभारण्यात अालेल्या मॉटेरा या सर्वाधिक क्षमता असणार्या स्टेडीयमवर यां सामन्यांची रंगत होणार आहे. यानंतर काही सामने महाराष्ट्रातसुद्धा खेळले जाणार आहेत. मात्र महाराष्ट्रात ईंग्लण्ड क्रिकेट संघाला खेळू देणार नाही. असा आक्रमक पवित्रा शिवदुर्ग संवर्धन आंदोलन या संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासूम छ. शिवाजी महाराजांची जगदंबा नावाची तलवार ही ईंग्लण्डमध्ये आहे. छ.शिवाजी महाराजांनी ज्या तलावारीच्या सहाय्याने जुलुमकर्त्यांचा नाश केला आणि स्वराज्य स्थापन केले. ती तलवार आमच्यासाठी आमची अस्मिता आहे. ईंग्लण्डमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सेंट जेम्स पॅलेस याठिकाणी राणीच्या वैयक्तीत संग्रहालयात ही तलवार ठेवण्यात आली आहे. छ.शिवाजीमहाराजांची ती तलवार भारतात आणण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलन आग्रही आहे. आम्ही तसे प्रयत्नही केले. मात्र सरकारने आता याबाबत गंभीरतेची भूमिका न घेतल्यास ईंग्लण्ड संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही. याप्रसंगी गनीमी काव्याने आंदोलन करु असा ईशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी दिला आहे.
यावेळी ईतिहास संशोधक ईंद्रजीत सावंतसुद्धा पत्रकारपरिषदेत ऊपस्थित होते. ई.स. १८७५-७६ च्या सुमारास छ.शिवाजी चौथे कोल्हापुरच्या गादीवर राज्य करत होते. त्यांचे वय अवघे अकरा वर्षे होते. तेव्हा कोल्हापुरचे दिवान माधव बर्वे यांनी तत्कालीन प्रीन्स सातवा एडवर्धस याच्या भेटीवेळी जबरदस्ती ती तलवार भेट स्वरुपात देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर अनेकांनी ही तलावर भारतात परत आणण्याची घोषणा केली होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान, बॅरीस्टर अंतुले, खा. संभाजीराजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंद्धी घोषणा केल्या होत्या. मात्र अद्याप जगदंबा तलवार ही ईग्लण्डमध्येच आहे.