माजी सरन्यायाधिश असलेल्या रंजन गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. या केलेल्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. माजी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
तसेच न्यायालयात न्याय मिळणं दुरापास्त झालं आहे, असं वक्तव्य माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
मला विचारलं तर कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात अजिबात जाणार नाही. न्यायालयात जाणं म्हणजे पश्चाताप करून घेण्यासारखं आहे. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.
न्यायाधीशाची पूर्ण काळ वचनबद्धता असते. कामाचे तास निश्चित नसतात. रात्री 2 वाजता उठून आम्ही काम केलेलं आहे, असं रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.