टाटा ग्रुपचे चेअरमन आणि प्रमुख रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान आहे. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या कंपनीतील कामगांराच्या पगारात कपात न करता त्यांनी पुर्ण पगार दिले होते. त्यामुळे टाटांना भारतरत्न द्यावा अशी मागणी जोर धरू लागली. मात्र टाटांनी ही मागणी थांबवण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, सोशल मिडियावर काल रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग देखील काल ट्रेंड सुरू झाला होता. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
लोकांचे प्रेम पाहून भारावलेल्या रतन टाटा यांनी शनिवारी ट्विट करून सर्वांचे आभार मानले. त्यांनी लिहिलं की,’मला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावरून तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण, मी एक विनंती करू इच्छितो की ही मोहीम थांबवावी. मी स्वतःला भारतीय असल्याचे भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देत राहीन.’
रतन टाटा यांच्या समाजकार्याची यादी फार मोठी आहे. कोरोना संकटाच्या काळातही त्यांनी हे समाजकार्य सुरूच ठेवले. एक यशस्वी उद्योगपती बरोबरच मोठ्या मनाचा माणूस, अशीही त्यांची ओळख आहे. डॉ. विवेक बिंद्रा यांनी केलं ट्विट करत रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली. तसेच या मोहीमेत सर्वांनी सहभाग घेण्याचं आवाहनही त्यांनी केले.