तिसऱ्या वनडेत भारताचा विजय, रचला इतिहास !

25

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. विजयासह भारताने ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचला आहे. आतापर्यंत कधीच भारतीय संघाला जे ऑस्ट्रेलियामध्ये करता आले नव्हते ते विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने करून दाखवले आहे.

मागच्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत होता. पण आतापर्यंत भारताला या मैदानात विजय मिळवता आलेला नव्हता. त्यामुळे भारताने या सामन्यात तब्बल १२ वर्षांनी पहिला विजय मिळवला आहे. भारताने आजच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने वनडे मालिका यापूर्वीच गमावली होती. पण या सामन्यात विजयासह इतिहास रचल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला.