स्वदेशी लस कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादची कंपनी भारत बायोटेक ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या मदतीने करत आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापराला 3 जानेवारीला मंजुरी मिळाली होती.
भारतीय स्वदेशी लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या 617 प्रजातींवर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी दिली आहे.
व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी सांगितले की, आम्ही कोरोनासंबंधी रोज डेटा गोळा करतोय. जे लोक भारतीय कोवॅक्सिन लस घेत आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर ती लस कोरोनाच्या 617 प्रजाती अर्थात व्हेरिएन्टवर गुणकारी आहे असे समोर आले आहे.
स्वदेशी लस म्हणून ओळखली जाणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा फेज 3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. यात ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर 78 टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल आयसीएमआरनं दिला आहे.