ऊद्योगविश्वात रुची ठेवणार्यांसाठी टाटा हे आदर्शवत नाव आहे. ऊद्योगपती म्हणून नावरुपास येणार्या प्रत्यकाचे जमशेदजी टाटा अाणि रतन टाटांसारखे होण्याचे स्वप्न असते. कारण भारताच्या उद्योग जडणघडणीत टाटा समूहाचे योगदानच तेवढ्या ऊंचीचे आहे. काही दिवसांअगोदरच रतन टाटा यांचा जन्मदिवस पार पडला. देशातील रतन टाटांचे योगदान बघता त्यांना भारत रत्न द्यावा अशी मागणी जोर धरु लागली होती. सोशल मिडीयासोबतच अनेकांनी राजकीय पुढार्यांना पत्रे लिहूनसुद्धा ही मागणी केली आहे. मात्र रतन टाटा यांनी सोशल मिडियावरील हे कॅंम्पेन थांबवण्याचे भावनिक आवाहन ट्वीट करुन केले आहे.
२१ व्या शतकात जेव्हा ऊद्योगक्षेत्राची प्रचंड वाढ होत होती तेव्हा जमशेदजी टाटा यांनी टाटा ऊद्योगसमुहाची भारतात सुरुवात केली. भारताच्या ऊद्योजकतेत टाटा समूहाचे अमुल्य योगदान राहिले आहे. अाज भारतासह जगभरात टाटा विस्तारलेले आहेत.
जमशेदजी टाटांनंतर टाटा समूहाची धुरा ही रतन टाटा यांचेकडे आली. रतन टाटांचे उद्योग वाढविण्यासाठीचे धोरणं आणि ठरवलेल्या ध्येयावर सत्यात ऊतरण्यासाठी घेतलेले श्रम, कामावरचे प्रेम या गोष्टींमुळे भारतातील मोठा तरुण वर्ग त्यांचा चाहता आहे. तसेच भारताच्या सामाजिक क्षेत्रात टाटा समुहाचे योगदान बघता अनेकांच्या हृदयावर टाटा राज्य करतात. याच पार्श्वभूमिवर रतन टाटा यांना भरतरत्न देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर जोर धरते आहे. #Bharatratnaforratantata या हॅसटॅगखाली ट्वीटरवर हे कॅंम्पेन चाोवण्यात आले होते. टाटांनी मात्र हे कॅपेन बंद करण्याची विनंती आपल्या ट्वीटरद्वारे केली आहे.
काय म्हणाले टाटा?
“मला भारतरत्न मिळावा याकरिता आपण जी मतं व्यक्त केली आहेत. त्याबद्दल खरोखर मी खुप आभारी आहेे. परंतू आपण हे कॅ्म्पेन थांबावावे अशी माझी नम्र विनंती आहे. मी भाग्यवान आहे की मी भारतीय आहे आणि भारताच्या विकासासाठी मी कायमच प्रयत्नशील असेन.”