कुख्यात डॉन अरुण गवळीला कोरोनाची लागण

10

शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अरुण गवळी त्याच्या काही दिवस आधीच पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे. सध्या नागपूर कारागृहात अरुण गवळी कैद आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अरुण गवळीला कोरोनाची लक्षण दिसत होती. यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. गवळीसोबतच इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कारागृहातीलच विलगणीकरण कक्षात सर्वांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.