महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे रिपब्लिकन पक्षाचे राज्यभरात तीव्र आंदोलन

34

दोन वर्षापूर्वी अंबरनाथ येथे एका कार्यक्रमात रामदास आठवले यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्या अनुषंगाने आठवले यांना सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.परंतु केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या संरक्षणात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारने जाणिवपूर्वक व जातीय द्वेषभावनेतून केला असून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निर्णयाविरोधात निषेध करीत राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.

सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा व रामदास आठवलेंची सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी गौतम सोनवणे यांनी केली आहे.केंद्रातील मंत्री असताना ही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने जाणिवपूर्वक राजकीय सूडबुध्दीने हा निर्णय घेतला आहे.असाही आरोप त्यांनी केला आहे.

राज्याच्या राज्यमंत्र्याला जास्त सुरक्षा व केंद्रीय राज्यमंत्र्यांना कमी सुरक्षा हे कोणते सुरक्षेचे धोरण राज्य सरकारने व मुंबई पोलिसांनी अंगीकारले आहे, असा प्रश्न गौतम सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.