आंतरराष्ट्रीय पॉप स्टार ‘रिहाना’चे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट, मोदिंपेक्षा एक पाऊल पुढे

10

मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, ॲक्ट्रेस रिहाना हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.

रिहानाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “आपण यावर काही बोलत का नाही आहोत?” या ट्वीटमध्ये तिने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलं तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केले आहे. काही तासात रिहाना भारतात टॉप ट्रेंडवर पोहचली.

पीएम मोदींचे ट्विटरवर 63.5 मिलियन म्हणजेच 6 कोटी 35 लाख फॉलोवर्स आहेत. तर रिहानाचे तब्बल 1001 मिलियन्स म्हणजेच 11 कोटी फॉलोवर्स आहेत. याचा अर्थ असा आहे की, ट्विटरवर रिहाना पीएम मोदींपेक्षा जास्त लोकप्रिय आहे असे दिसत आहे. रिहाना एकूण 1029 लोकांना फॉलो करते, तर मोदी 2351 जणांना ट्विटरवर फॉलो करतात.