IPL : चेन्नईच सुपर ‘किंग’

28

इंडियन प्रीमियर लीग सध्या जोरात सुरू आहे. काल रविवारी चेन्नई सुपरकिंग्जचा मोठा धमाका पाहायला मिळाला. चेन्नईने
रात्री झालेल्या सामन्यात के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 विकेट्सने दणदणीत मोठा पराभव केला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 179 धावांचे लक्ष्य चेन्नईने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिस या सलामीवीर जोडीने चेन्नईला सहज विजय मिळवून दिला. या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतल. फक्त 106 चेंडूत नाबाद 181 धावांची धमाकेदार सलामी भागीदारी केली. आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

शेन वॉटसनने 53 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूला फॅफ डु प्लेसिसनेही नाबाद 87 धावा केल्या.  पंजाबच्या एकाही गोलंदाजाला चेन्नईची एकही विकेट मिळवता आली नाही. यादरम्यान, या दोन फलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी रचली. अनेक सामने हरल्यानंतर हा विजय चेन्नईला फॉर्म मध्ये घेऊन गेला आहे.