काल झालेल्या सामन्यात किंग्जस इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला आहे. पंजाबने सुरुवातीला १२७ इतक्या माफक धावांचे आव्हान हैदराबादला दिले होते. मात्र, पंजाबने जोरदार गोलंदाजी करत हैदराबादचा डाव 19.5 षटकात ११४ धावांवर गुंडाळला. पंजाबच्या गोलंदाजांनी अजून आणि भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले, परिणामी हैदराबादच्या फलंदाजांनी विकेट सोडत नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ३५ तर विजय शंकरने २६ धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डन या जोडगोळीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी, मुर्गन आश्विन आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत अर्शदीप आणि ख्रिसला मोलाची साथ दिली.
दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून १२६ धावा केल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद ३२ धावा केल्या. तर त्यानंतर कर्णधार लोकेश राहुलने २७ रन्स केल्या. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि रशिद खानने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.