मुंबई इंडियन्स ने काल झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पाच गडी राखून पराभूत केले. या विजयामुळे मुंबई प्ले ऑफच्या जवळ जाऊन पोहचली आहे. बंगळूर ने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. देवदत्त पडिकलने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईने ५ चेंडू आणि ५ गडी राखून बंगळूरचा पराभव केला.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक नाबाद ७९ धावांची खेळी केली. ईशान किशन २५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पुन्हा केरोन पोलार्डने संघाचे नेतृत्व केले. आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासात मुंबईने बेंगळरू संघाचा १७ वेळेस लागोपाठ पराभव केला आहे. सध्या आयपीएल शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोण प्ले ऑफमध्ये जाणार याबद्दल क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता आहे.