सांघिक खेळाच्या बळावर हैदराबादने काल धमाकेदार विजय मिळवत दिल्ली कॅपिटल चा ८८ धावांनी मोठा पराभव केला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि आयपीएल मध्ये यावर्षी पहिला सामना खेळणाऱ्या वृद्धिमान सहा यांच्या जोरदार फटकेबाजी नंतर फिरकी गोलंदाज रशीद खान याच्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबाद संघ विजयी ठरला. प्रथम फलंदाजी करताना २१९ धावांचा मोठा डोंगर हैदराबाद संघाने उभा केला. ह्या आवाहन दिल्ली पेलवू शकले नाही. १३१ धावांमध्ये त्यांचा डाव गडगडला.
दिल्ली कडून सर्वाधिक धावा रिषभ पंत ३६ याने तर अजिंक्य राहणें ने २६ धावा केल्या. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. ५८ चेंडूत १०७ धावांची सलामी भागीदारी वॉर्नर आणि सहाने केल्याने हैदराबादचा विजय सुकर झाला.