आयपीएल : बेंगळूरचा पराभव करत दिल्लीचा प्ले ऑफ प्रवेश दिमाखात

4

शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर काल झालेल्या दिल्ली आणि बेंगळूर मध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला तसेच प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा ६ गाड्यांनी पराभव केला. चांगल्या सुरुवातीनंतर मोक्याच्या क्षणी विकेट पडल्याने बेंगळूर संघाला पराभव पत्करावा लागला.

आरसीबीने ७ गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकांमध्ये १५२ धावा केल्या. दिल्लीने १९ षटकांमध्ये ४ गाड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. आणि दिमाखात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला. दिल्लीतील खेळाडू धवन, राहणे जोडीले विजयाची पायाभरणी केली. रहाणेने ४६ चेंडूत ६० धावा तर धवनने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या. आज आयपीएल चा शेवटचा सामना होईल आणि त्यानंतर प्ले ऑफचा चित्तथरारक सोहळा क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे.