देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशासह राज्यात मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनले आहे. देशातील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. ऑक्सीजन आणि बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने मृत्यूच प्रमाण वाढत चाललं आहे.
कोरोनाचे जागतिक संकट लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान प्रमिअर लीग (पीसीएल) स्पर्धा पुढे ढकलण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दिला आहे.
नागरिकांचे जीव वाचणं महत्वाचं आहे. क्रिकेट नाही असा निर्वाळा त्याने दिलाय. सदरील क्रिकेट स्पर्धांवर खर्च होणारा पैसा कोरोना संकटासाठी वापरण्यात आला तर मोठी मदत होईल, असं अख्तर म्हणाला.
‘आयपीएल स्पर्धा महत्वाची नाही आणि त्यावर खर्च होणारा पैसा ऑक्सिजन टँक खरेदी करण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील. सध्या आपल्याला क्रिकेटचे हिरो किंवा मनोरंजनाची गरज नाहीय. सध्या आपल्याला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचे जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. रोज मृत्यूंची संख्या वाढत आहे. म्हणून मी हे कठोर विधान करतोय’ असं परखड मत शोएब अख्तरनं व्यक्त केलं आहे.