इंडीयन प्रीमियर लिगचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. सर्वच संघांनी कसून सराव करण्यासाठी सुरुवात केली आहे. अनेक परदेशी खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. भारत यंदा वर्षाच्या शेवटी टी-20 विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक याने इंगलांच्या खेळाडूंचा आयपीएल मध्ये वाढलेला सहभाग लाभदायक असल्याचं म्हटलं आहे. वर्षाअखेर टी-20 विश्वकप स्पर्धा होईल, त्यानिमित्ताने आयपीएल स्पर्धेत भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी इंग्लंड खेळाडूंना फायदा होईल, असं स्टोक म्हणाला.
आयपीएल मध्ये गेल्या काही वर्षात इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या वाढत आहे. यंदा 14 खेळाडूंनी फ्रांचायजी सोबत करार केला आहे. त्यामधे इयोन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, मोईन अली, सॅम कुरेन, टॉम कूरेन, सॅम बिलींग्ज, लियाम लिविंगस्टोन, व डेव्हिड मलान यांचा समावेश आहे.