संजय राठोड प्रकरणावरुन महाविकासआघाडीतील अस्थिरता वाढतेय का?

26

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे नाव पुढे आले. आणि तेथूनच महाविकासआघाडी सरकारसमोर अडचणीत वाढ झाली. धनंजय मुंडे यांचे प्रकरण शांत होते ना होते तो हे नविन प्रकरण आता सरकारसमोर आ वासून ऊभे राहिले. विरोधात असणार्‍या भाजपनेसुद्धा या प्रकरणावरुन आक्रमक पवित्रा घेतला आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले. पुजा चव्हान हीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यानंतर पंधरा दिवस ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. अखेर मंगळवारी (दि.२२ फेबृ) ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी याठिकाणी हजारोंच्या संख्येने ऊपस्थित समर्थकांसमवेत पोहचले आणि विरोधकांना त्यांनी आणखी रान मोकळे करुन दिले.

कोरोना नियम पाळण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनला त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्याने केराची टोपली दाखवली यावरुन भाजपने महाविकासआघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसमधुनसुद्धा नाराजीचा सुर ऊमटत आहे. परिणामी संजय राठोड प्रकरण महाविकासआघाडी सरकारमधील अस्थिरता वाढवणार असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. मात्र राजीनामा स्विकारण्यावरुन शिवसेनेतच दोन गट पडले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावेळी राजीनामा घेतला नाही मग आपल्या नेत्यावर हा दबाव कशाला? असा सवाल करणारा एक गटसुद्धा शिवसेनेत आहे. संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात आणि समाजाचा त्यांना प्रचंड पाठींबा आहे. पोहरादेवी याठिकाणी झालेले शक्तीप्रदर्शन तेच दाखवण्याचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. संजय राठोड यांचे पश्चिम विदर्भातील मतदारसंघातील समाजावर प्रभृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याअगोदर विचार करणे शिवसेनेस ईष्ट आहे. परिणामी शिवसेना कोंडीत सापडली आहे.

शरद पवार, बाळासाहेब थोरात यांनी संजय राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेंसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीसुद्धा यावर नारजीचा सुर घेत पश्चिम बंगालमधील गर्दीवरुन भाजपवर निशाना साधला आहे. अद्याप संजय राठोड यांच्यावर कुठलिही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजप आक्रमकतेने वारंवार मुद्धा ऊचलुन धरते आहे. अशावेळी शिवसेना यावर काय पर्याय काढते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.