परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर आपल्या देशातील खेळाडू आणि कलाकारांनी त्यांस प्रत्युत्तरादाखल ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये साधर्म्य जाणवत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसनी या ट्वीटची चौकशी करण्याची मागणी केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेऊ असे जाहीर करताच, हे चौकशी प्रकरण भाजपच्या नेत्यांना चागलेच झोंबले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर कोरोनामुळे त्यांच्या मेंदुवर परिणाम होत असल्याची टीका केली. यावरुन रोहित पवार चांगलेच संतापले आहे. अशाप्रकारची टीका करुन भाजपचे नेते आपले संस्कार दाखवून देतात असे ट्वीट करत कडक शब्दांत त्यांनी भातखळकरांचा समाचार घेतला आहे.
देशातील कलाकारांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या ट्वीटमध्ये बर्याचअंशी साधर्म्य असल्याचे जाणवते असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शरद पवार, संजय राऊतसह अनेक नेत्यांनी या प्रत्युत्तरादाखल केलेल्या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकार या सेलीब्रीटींवरअशाप्रकारचे ट्वीट करण्यासाठी दबाव आणत असल्याची शक्यतासुद्धा नाकारता येत . त्यामुळे या ट्वीटची चौकशी व्हावी असे निवेदन कॉंग्रेसने गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. प्रकरणाची चौकशी करु असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुखवर टीकास्त्र सोडले.
अनिल देशमुख यांना कोरोना झाला असून सध्या ते रुग्णालयात ऊपचार घेत आहे. दरम्यान “कोरोनामुळे मेंदुवरसुद्धा परिणाम होतो, अनिल देशमुख जरा काळजी घेउन बोलत जावे” अशा प्रकारच्या संवादाचा एक व्हिडिअो त्यांनी ट्वीट केला आहे. यावरुन अनिल देशमुख यांचा बचाव करत रोहित पवार चांगलेच संतापले आहे.
“भाजपच्या अनेक नेत्यांना कोरोना झाला तेव्हा आम्ही लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या. भाजोचे नेते शुभेच्छा तर देतच नाहीत, पण कोरोनामुळे मेंदुवर परिणाम होत असल्याचे बरळत त्यांचे संस्कार दाखवून देतात” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.