सध्या चर्चेत असणार्‍या नरेंद्र मोदी स्टेडीयमचे नाव याअगोदर खरचं सरदार पटेल स्टेडीयम होते का? जाणुन घ्या

13

सध्या ईंग्लण्ड विरुद्ध भारत असा कसोटी सामना खेळवला जात असणारे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयम चर्चेचा विषय ठरते अाहे. जगातील सर्वात मोठे स्टेडीयम म्हणून नुकतेच हे नावरुपास आले आहे.  भारत आणि ईंग्लण्ड  यांच्यातील तीसरा कसोटी सामना सुरु होण्यापुर्वी अहमदाबाद येथील पुनर्विकसीत करण्यात आलेल्या स्टेडीयमचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.  दि २४ फेबृवारी २०२१ पासून हे स्टेडीयम नरेंद्र मोदी यांच्या नावाने अोळखले जाणार असे जाहीर करण्यात आले. यावरुन विरोधकांनी मात्र नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली.

या स्टेडीयमचे पुर्वीचे नाव सरदार पटेल स्टेडीयम होते. असे विरोधकांचे म्हणने आहे. त्यामुळे स्टेडीयमचे नरेंद्र मोदी असे नामकरण केल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा अपमान असल्याचे कॉंग्रेसचे म्हणने आहे. यावरुन कॉंग्रेसने भाजपला चांगलेच धारेवर धरले. संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्पलेक्सला सरदार पटेलांचे नाव आहे. त्यातील एका स्टेडीयमचे नामकरण केले आहे. असे केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांना सुनावले.    परंतू याअगोदर या  स्टेडीयमचा ऊल्लेख कुठल्या नावाने होत होता? या स्टेडीयमचे पुर्वीचे नाव सरदार पटेल स्टेडीयमच आहेत का? हा प्रश्न निरुत्तरच होता.

यासंबद्धीची माहिती गुजरातमधील क्रीडा पत्रकार तुषार त्रीवेदी यांनी दिली आहे. ई.स. १९८३ मध्ये हे स्टेडीयम ऊभारण्यात आले आहे. त्यावेळी याचे नाव गुजरात स्टेडीयम असे होते. माजी राष्ट्रपती  ग्यानी झैलसींह यांच्याहस्ते या स्टेडीयमचे ऊद्धाटन करण्यात आले होते. १९९४- ९५ च्या दरम्यान या स्टेडीयमला सरदार पटेल यांचे नाव देण्यात आले होते. आत्ताचे स्टेडीयमचे तीसरे नामकरण असल्याचे तुषार यांनी सांगीतले. ते बीबीसी हिंदी वाहिनीशी याबाबत बोलत होते.

काही महत्वांच्या ट्वीटरवरुनसुद्धा या स्टेडीयमचा ऊल्लेख याअगोदर सरदार पटेल असाच केला जात असल्याचे समोर येते. नुकतेच ईंग्लण्ड क्रिकेट संघानेसुद्धा सरदार पटेल असाच या स्टेडीयमचा ऊल्लेख केला आहे.

२०२० मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा होता. यावेळी आयोजित करण्यात आलेला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम याच स्टेडीयमवर पार पडला होता. त्यावेळीसुद्धा प्रसार भारतीने या स्टेडीयमचा ऊल्लेख सरदार पटेल स्टेडीयम असाच केला होता.