यही है अच्छे दिन? म्हणत ईंधन दरवाढीवरुन युवा सेना मैदानात

10

ईंधन दरवाढ आणि घरगुती गॅसच्या किंमतीत होणार्‍या वाढीवरुन राज्यात चांगलेच राजकारण तापते आहे. काहीठिकाणी पेट्रोलने शंभरी गाठली आहे. सीलेंडरच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. परिणामी सामान्य जनता यावर नाराज आहेच. सोबत आता विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. महराष्ट्र कॉंग्रेसचव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या मुद्दयावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता युवासेनेनेसुद्धा यात ऊडी घेतली आहे. हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल करत यवासेनेकडून पोस्टरबाजी करण्यात येत आहे.

शिवसेना आणि मनसे अनेकदा पोस्टरबाजीतुन निषेध व्यक्त करत असल्याचे आपण बघितले आहे. ईंधन दरवाढीवरुन युवासेनेने पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे परिसरात ठिकठिकाणी युवासेनेच्यावतीने पोस्टर लावण्यात आले आहे. यावर २०१५ आणि २०२१ च्या ईंधन दरांची तुलना करण्यात आली असून यही है अच्छे दिन? असा सवाल विचारण्यात येत आहे.

कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष ईंधन दरवाढीवर सातत्याने आक्रमक प्रतिक्रिया देत आहे. युपीए सरकारच्याकाळात ईंधनांच्या दरांत वाढ झाली की सेलीब्रीटींपासून सगळेच अोराडयचे. आता मात्र कुणीही दरवाढीवर बोलतांना दिसत नाही. प्रसंगी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरसुद्धा पटोलेंनी टीका केली होती.

राहुल गांधीसुद्धा दरवाढीवरून सरकारवर निशाना साधत आहेत. सामान्यांचा खिसा रिकामा करण्याचे काम सरकार करत असल्याचे त्य‍ांनी म्हटले आहे. तिकडे प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीसुद्धा थेट सायकलने रस्त्यावर उतरुन दरवाढीचा निषेध नोंदवला आहे.