भारतीय जनता पार्टीच्या मास लीडर पंकजा मुंडे संवेदनशील नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरून त्या नेहमीच विविध कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे, तसेच मान्यवरांना भेटीबद्दलची माहिती समर्थकांना देत असतात.
सध्या पंकजा या त्यांच्या कुटुंबियांसोबत महाबळेश्वर येथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेल्या आहेत. त्यावेळी घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी फेसबूकवर एका वाहनचालकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. महाबळेश्वर येथून परतत असताना वाहनचालकाने हात दाखवून गाडी थांबवण्याची विनंती केली. यावर त्यांनी गाडी थांबवून वाहनचालकाची भेट घेतली. संबधित वाहनचालकाचे नाव लोंढे असून ते पंकजा यांचे मोठे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. लोंढे यांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. आणि तो फेसबूकवर पोस्ट केला.
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट…
“लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो.. पण मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो.. दोन दिवस हवा बदल म्हणुन मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली driver लोंढे होते त्यांनी अगदी भावुक होऊन माझ्या कार्यक्रमाची इतमभूत माहिती ते कशी ठेवतात हे सांगितले अगदी माझ्या पोस्ट किती ते आपुलकीने like करतात हेही सांगितले. ..तितक्यात गाडीतील विद्यार्थी उतरले बाजूच्या बस मधील प्रवासी उतरले त्यांनी ही फोटो काढले….”