नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रातील भरती नियमातही मोठ्या सुधारणा करण्यात आली आहे.
देशात इयत्ता ६ वी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता मोफत पाठ्यपुस्तकं देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतला आहे. नवोदय विद्यालय कार्यकारिणीची चाळीसावी बैठक पार पडली.
याबैठकीला द्रीय शिक्षण मंत्री डॉ.रमेश पोखरियाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी, शाळांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्यानं सुधारणा देणे गरजेचं असल्याचे म्हंटल आहे.
या बैठकीतच देशातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात ईशान्य, हिमालयीन विभाग आणि जम्मू काश्मीरसाठी विशेष भरती मोहिम तसचं नववी नंतरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत औषधी गोळ्या देण्यासंदर्भातील निर्णयांचा समावेश आहे.