महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसमधील शीष्टमंडळाने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाविकासआघाडीत समान कार्यक्रमावर भर देण्यात यावा अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली.
महाविकासआघाडीत कॉंग्रेसच्या खात्यांवर निधी वाटप करण्यात अन्याय होतो, अशा चर्चा मध्यंतरी समोर येत होत्या. समान कार्यक्रमाचा आढावा घेऊन कॉंग्रसला समान निधी वाटप करण्यात यावा अशी मागणीसुद्धा एच.के. पाटील यांनी केली.
राज्यातील महत्वाच्या विषयांवरसुद्धा यावेळी चर्चा करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. कॉंग्रेस – युपीएच्या विषयावर संजय राऊत यांनी केलेल्या विधानांवरसुद्धा कॉंग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
राज्यात महाविकासआघाडी सरकारची प्रतिमा मलीन होते आहे. सचिन वाझेंसारखे प्रकरण त्यात भर घालत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेसुद्धा एच.के. पाटील यावेळी म्हणाले आहेत.