प्रशासनातील अधिकाऱ्याने सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही: प्रवीण दरेकर

34

भाजप सरकारने खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकार आल्यानंतर माझी बाजू मांडून मला शासन स्तरावर काम करण्याची संधी दिली.’ असं मत व्यक्त करत तात्याराव लहाने यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता.

प्रशासनातील अधिकाऱ्याने सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता, अशी आठवण प्रवीण दरेकर यांनी यावेळी त्यांना करून दिली.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अधिकाऱ्यांनी चार भिंतीच्या आत बोलावे, असे म्हंटले आहे.भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, नेत्रतज्ज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले होते.

त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात.असे त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले.