लोकप्रतिनिधींकडूनच होते आहे कोरोनाच्या नियमांचे ऊल्लंघन !

17

मध्यंतरी कोरोनाचा वेग अोसरत असल्याचे चित्र असले तरी आता मात्र कोरोनाने सर्वासामान्यांच्या अडचणींत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातुन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्यामुळे निर्बंधसुद्धा लावण्यात येत आहेत. काळजी न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल असा ईशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मात्र जेथे जनता कोतोनाचे नियम पाळत नाही असे म्हणत सर्वसामान्यांच्या नावानेच खडे फोडले जातात तिथे लोकप्रतिनिधींकडून कोरोनाच्या नियमांचे ऊल्लघन होत असल्याचे निदर्शनास येते आहे.

पुण्यात माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या लग्नात राजकीय वर्तुळातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतू यावेळी ना फिजीकल डीस्टंन्सीग होते ना तोंडावर मास्क. आता अशावेळी ज्या लोकप्रतिनिधींचा आदर्श घेऊन सामान्य जनता वाटचाल करत असते त्यांनीच कोरोनाच्या नियमांचा फज्जा ऊडवला असता. लोकांनी काय करावे? असा प्रश्न ऊपस्थित केला जात आहे. लोकमत अॉनलाईनने यासंबंद्धिचा लग्नातील व्हिडिअो ट्वीट करत प्रकरणाची अधिकृत माहिती दिली आहे.

पुण्यातील लक्ष्मी लॉन याठिकाणी धनंजय महाडीक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडीक आणि वैष्णवी देशमुख यांचा विवाह सोहळा पार पडला. यामध्ये अनेक राजकीय हस्तींनी उपस्थिती लावली होती. त्यापैकी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय राऊत, शरद पवार अशा सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतांना लोकप्रतिनिधींच्या या वागण्यावरुन त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.

यापुर्वीही आपण बघीतले की, कोरोनाचा वेग वाढत असल्याची परिस्थिती असतांनासुद्धा नेत्यांच्या सभांना, मिरवणुक‍ांना आणि आंदोलनांना प्रचंड गर्दी आहे. सभा, मिरवणुका आणि आंदोलनांना मनाई नाही. मात्र कोरोना अजूनही आपल्यात असल्यामुलके नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि ऊपमुख्यमंत्र्यांकडून सातत्याने होते आहे. काही दिवसांअगोदर कोरोनाचे नियम पाळत नसल्यामुळे अजित पवारांनी संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री आणि प्रशासनातील अधिकार्‍यांकडूनसुद्धा सामान्य जनतेवर कारवाईचा बडगा ऊगारला जात आहे. अशावेळी मुख्यमंत्री, ऊपमुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासन यावर काय कारवाई करते? की सगळे नियम सामान्यांसाठीच आहेत हे बघण्यासारखे असणार आहे.