मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने लवकरात लवकर भूमिका घ्यावी, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
आता उदयनराजे यांनीही मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा समाजाचा उद्रेक झाला, तर त्याला राज्यकर्ते जबाबदार असतील, असे म्हटले आहे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर संभाजीराजे यांनी एल्गार केला असून, १६ जूनपासून कोल्हापूरातून राजर्षि शाहुंच्या समाधीपासून राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनास प्रांरभ केला जाईल, असे इशारा देण्यात आला आहे.
तसेच संभाजीराजे माझे धाकडे भाऊ आहेत. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आले, कोणाचे काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा रोकडा सवालही उदयनराजे यांनी केला आहे.