नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच: शिवसेना खासदार

26

शिवसेना खासदार वियाणक राऊत यांनी नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच, असा टोला भाजपला मारला होता.ही टीका केल्यानंतर नारायण राणे पुत्र निलेश राणे यांनी राऊत यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल आता नवीन थापा झालाय अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नारायण राणे यांच्या रुग्णालयाचे उद्गाटना करून गेल्यापासून कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले आहेत .

भाषा बदलली नाही तर जिथे दिसशील तिथे फटके खायला घालणार अशी धमकीही निलेश राणे यांनी राऊतांना दिली आहे.