दुसरी लाट कमी होत असतांनाच तीसरी लाट येणार असल्याचे अंदाज वर्तवले गेले. तीसर्या लाटेमध्ये सर्वाधीक धोका हा लहान मुलांना असल्याचे सांगण्यात आले. दुसर्या लाटेन आपले प्रचंड नुकसान केले. त्यामुळे तीसर्या लाटेसाठी तयार राहण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सचीसुद्धा स्थापना केली तसेच यानिमीत्ताने अाशा सेविकांशी संवादसुद्धा साधला.
“तीसर्या लाटेत लहान मुलांना धोका असल्यामुळे सर्व भीस्त ही तुमच्यावरच असणार आहे. याअगोदरसुद्धा अनेक अडचणी असूनदेखील कोवीडकाळात तुम्ही पुष्कळ काम केले. परंतू आता तुमच्यावर जवाबदारी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक जोमाने काम करायचे आहे.” अशाप्रकारे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी आशा सेविकांना संबोधीत करत प्रोत्साहन दिले.
दुसरी लाट लक्षात यायला वेळ लागला. त्यामुळे प्रचंधस नुकसान झाले. कधीही भरुन न निघाणारी हानी झाली. मात्र आता तीसर्या लाटेला रोखायचं आहे. असेसुद्धा ऊद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच आशा सेविकांच्या समस्या समजून घेतल्या असून त्यावर लवकरच ऊपाय शोधू असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.
अनेक तज्ज्ञ डॉक्टर या संवाद कार्यक्रमात ऊपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या संवादाद्वारे अाशा सेविकांना प्रोत्साहीत करीत त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मानाचा मुजरासुद्धा केला.