जगातील सर्वाधीक लस ऊत्पादित करणारी कंपनी म्हणून अोळख असणार्या सीरम ईन्स्टीट्युट अॉफ ईंडीयाचे सीईअो अदर पुनावाला गेल्या काही दिवसांपासून लंडनलाच आहेत. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अदर पुनावाला लंडनला गेले असल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे.
मुख्यमंत्री व अदर पुनावाला यांच्यात महाराष्ट्राला लस देण्याबाबत चर्चा झाली होती. जुन महिन्यापासून दीड कोटी लस देण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र त्याच्या दुसर्याच दिवशी केंद्र सरकारने पुनावाला यांना तंबी दिली आणि त्यांनी आपला मुक्काम लंडनला हलवला. असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.
अहमदनगरनध्ये कार्यक्रमादरम्यान हसन मुश्रीफ बोलत होते.
केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण पूर्णत: फसलेले आहे. आम्ही ग्लोबल टेंडर काढले होते. लसीकरणासाठी ६ हजार कोटी रक्कम एककरमी देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली होती. मात्र एकाही लस ऊत्पादक कंपनीने आम्हाला प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी म्हटले.
लसीकरणाच्या धोरणात गोंधळ निर्माण झाल्याने केंद्र सरकार आता हात वर करते आहे. ४५ वर्षांपुढील व्यक्तींना केंद्र सरकार लस देणार आणि १८ वर्षांवरील व्यक्तींना राज्य सरकारने लस द्यावी असे सांगण्यात आले आहे. मात्र लसीकरणाबाबत एककलमी धोरण आखून केंद्र सरकारने संपूर्ण जवाबदारी घेणे गरजेचे असल्याचेसुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले.