पं.बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपसाठी ईतर राज्यांपेक्षा बंगाल जास्त महत्वाचे आहे, तर ममता बॅनर्जींसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर प्रचारसभा आणि मोर्चांना ऊधान आले आहे. अशांतच पं. बंगालच्या राजकीय वर्तुळाला वेगळे वळण देणारी घटना नंदीग्राम येथे घडली. एका रॅलीदरम्यान ममता बॅबर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. तृणमुल कॉंग्रेसने हा हल्ला असल्याचा दावा केला तर भाजपने यांस पब्लीसीटी स्टंट संबोधले. अखेर निवडणुक आयोगाने यावर महत्वाचे विधान केले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचा तृणमुलचा दावा फेटाळून लावत सुरक्षारक्षकांच्या तृटीमुळे त्या जखमी झाले असल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे. यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालानुसार मिदनापुर जिल्ह्याचे अधिकारी, पोलिस अधिक्षक आणि ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेची जावबदारी असलेले पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांचे सुरक्षा संचालक विविक सहाय यांना निलंबीत करण्यात आले आहे.
बुधवारी ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये विशाल मोर्चा काढला होता. यावेळी अचानक ममता बॅनर्जी खाली कोसळल्या आणि त्यांच्या पायाला व कंबरेला दुखापत झाली. तृणमुल कॉंग्रेसने हा ममता दिदीवर अज्ञातांनी हल्ला केला असल्याचा दावा केला होता. निवडणुक आयोगाने हा दावा फेटाळून लावला आहे.
मनता बॅनर्जी यांनी ऊपचार घेतल्यानंतर पुन्हा मोर्चांना सुरुवात केली आहे. थेट व्हीलचेअर त्यांनी काल मिर्चात सहभाग घेतला होता. ममता बॅनर्जींच्या या व्हीलचेअरमुळे पं.बंगालच्या राजकीय वर्तुळात चर्चेंना ऊधान आले आहे.