शरद पवार यांची बरोबरी करण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील : अमोल मिटकरी

21

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. पण त्यापूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच्या वेळी घटनास्थळी जाऊन पुतळ्याचे अनावरण केलं.त्याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केल्यानंतर भाजपनेच आता पडळकर यांचे कान टोचले आहेत.

या पुतळ्याचं अनावरण चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हावं अशी आमची इच्छा होती. पण शरद पवार यांचे विचार आणि वागणं हे अहिल्यादेवींच्या उलट आहे,” अशी टीका पडळकर यांनी केली होती.

त्यावर चोरासारखे धंदे बंद करा. शरद पवार यांची बरोबरी करण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे.